विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला चांदीने मढवण्याचे काम चालू, नांदेडच्या भक्ताच्या मदतीने कामाला सुरूवात
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता.
नांदेड येथील अरगुलकर परिवारातर्फे या दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे.
यासाठी 30 किलो चांदी लागणार असून याची किंमत सुमारे 30 लाख रूपये आहे.
अरगुलकर कुटुंबातील शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे.
अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत.
त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे.
यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.
येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.
त्याचप्रकारे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.