दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस 19015 ट्रेनचा प्रवासी नसलेला डबा (VPU) गुजरात मधील किम स्थानकावरून रेल्वे सुटत असताना 15.32 वाजता रुळावरून घसरला. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती मिळताच दुरुस्तीच काम सुरू केलं असून वरिष्ठ अधिकारी या कामावर देखरेख करत आहेत. या अपघातामुळे गाड्यांच्या सामान्य वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.
पश्चिम रेल्वेच्या गुजरात मधील कीम रेल्वे स्थानकावर हा रेल्वे अपघात झाला. इंजिनानंतर पार्सलचा एकही बॉक्स रुळावरून घसरला नाही. मात्र, गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली
वडोदराहून अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन किम स्टेशनवर पोहोचली आहे. रुळावरून खराब झालेले बॉक्स काढण्याचे काम सुरू करण्यात आले. रेल्वेचा मोठा कर्मचारी वर्ग घटनास्थळी पोहोचला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.
सध्या रेल्वेचे डाऊन ट्रॅक आणि मिडल ट्रॅक बंद आहेत, तर गाड्या एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर आणि फ्रेट कॉरिडॉरमधून जात आहेत. त्यामुळे, इतर वाहतुकीला अडथळ नाही.
या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवशांचा खोळंबा झाला आहे, अनेकांनी रेल्वे गाडीतून खाली उतरुन रेल्वेच्या गाडीचा डब्बा घसरण्याचा अनुभव सांगितला.
आम्ही ट्रेनमध्ये बसलो असता अचानक आवाज आला अन् रेल्वेच जागेवरच थांबली. त्यानंतर, आम्ही खाली उतरुन पाहिले असता कोच पटरीवरुन खाली आल्याचे एका प्रवाशाने सांगितलं.
दरम्यान, रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागाचे अनेक कर्मचारी सध्या ही ट्रेन पूर्ववत करण्यासाठी धडपड करत असून लवकरच काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.