Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Unseasonal Rain: नागपुरात अवकाळीचं थैमान; भर दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
उपराजधानी नागपुरात भर दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास शहरातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झालं आहे. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली आहेत.
जागोजागी झाडं उन्मळून पडल्याने वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
नागपूरसह विदर्भावर ढगांची दाटी झाली होती. दुपारपर्यंत ऊन आणि त्यानंतर लगेच काळेकुट्ट ढग दाटून आले. पाहता-पाहता मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली. छत्री आणि रेनकोट नसल्याने अनेकांना ओल्या अंगाने घरी परतावे लागले.
नागपुरात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने धुमशान घातले.शहरात जवळपास सगळीकडेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे.
दुसरीकडे, पावसामुळे तापमानात घट झाल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. परिणामतः नागपूरकरांना ऊन आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला.