Vasant Panchami 2021 | सावळे सुंदर, रुप मनोहर...
देवाचा शाही विवाह जगभरातील विठ्ठल भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो.
मंदिराच्या महाद्वार अर्थात नामदेव पायरीला देखील विवाह वाद्यांची आकर्षक सजावटीचे काम हाती घेतले असून यात विवाहातील सर्व वाद्ये, डोली फुलातून साकारले जाणार आहे.
दरम्यान, पांडुरंग आणि माता रखुमाई यांच्या मूर्तीलाच नव्हे तर मंदिराचा गाभाराही आकर्षत सजावटीनं जवण्यात आला आहे.
राज्यात अजूनही कोरोनाचं संकट संपलं नसल्यामुळं या विवाहसोहळ्यासाठी दरवर्षी प्रमाणे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना देवाच्या लग्नाला उपस्थित राहता येणार नसून त्यांना घरी बसूनच टीव्हीवर या आनंदात सहभागी व्हावे लागणार आहे.
असं असलं तरी कोरोनाचं संकट अजून गेलं नसल्याने देवाच्या विवाहातही कोरोनाची सर्व बंधने पाळावी लागणार आहेत.
यंदाचा विवाह सोहळा खास असून या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव सरस्वती, शंकर पार्वती, विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित राहणार आहेत.
Vasant Panchami 2021 वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -