In Pics | एखाद्या परदेशी नागरिकाप्रमाणं दिसणारे होळकरांचे सोळावे वंशज यशवंतराव चर्चेत
जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाला शरद पवार पोहचले होते. त्यांच्यासोबतच होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर, खासदार छत्रपती संभाजीराजे, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप , रोहित पवार, अशोक पवार आणि इतर नेते उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन जे राजकारण सुरू आहे, त्याबद्दल आपल्याला काहीही बोलायचं नाही असं म्हणत राजकारणात येण्याचाही आपला विचार नसल्याच यशवंतराव होळकर स्पष्ट केलं.
अहिल्याबाई होळकर यांचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आपण काम करणार असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
जेजुरी गडावर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर यांनी देखील उपस्थिती लावली. होळकर घराण्यातील सोळावे वंशज असलेल्या यशवंतरावांच्या आई आणि आजी दोघीही ब्रिटिश. त्यामुळे यशवंतरावांच दिसणं एखाद्या परदेशी, युरोपियन माणसासारखं आहे.
होळकर पगडी घातलेले आणि कपाळावर भंडारा लावलेले यशवंतराव होळकर, 'यळकोट यळकोट जय मल्हार', म्हणत जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येताच त्यांना पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -