राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा, या भागात पडणार पाऊस
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक ठिकाणी या पावसाचा फटका नागरिकांना बसलाय. कारण पावसाबरोबच अनेक ठिकाणी वादळी वारा देखील झालाय. यामुळं शेती पिकांचं (Agriculture Crop) नुकसान झालंय.
आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या अनेक काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे.
येत्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्याता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे
जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसलाय.
अवकाळी पावसामुळं नांदेड, बारामती आणि नाशिकच्या सुरगाण्यात पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
येत्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.