शेतकरी, महिला ते तरूण, भाजपच्या जाहीरनाम्यांत सर्वांसाठी आश्वासनं, 7 मुद्द्यांत समजून घ्या नेमक्या घोषणा काय?
दि. 20/11/2024 बुधवार रोजी महाराष्ट्रातात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री श्री अमितभाई शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया जाहीरनाम्यावेळी भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री सुधीर मुनगंटीवार इत्यादी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहिण योजनेत 1500 वरून 2100 रुपये, शेतकरी कर्जमाफी भावांतर योजना.
गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन, वृद्ध पेन्शन योजनेत 1500 वरुन आता 2100 रुपये .
गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न.
25 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य, विद्या वेतनाच्या माध्यमातून आम्ही अग्रेसर असणार, 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार.
फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल.
एरोनांनिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी, शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न.
2027 पर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार करणार, महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रात कौशल्य जनगणना.