Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द
36 दिवसात बनलेले तीन पक्षांचं सरकार... अडीच वर्ष चाललं आणि नऊ दिवसात कोसळलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला.
राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
तसेच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं जनतेला सांगितलं.
फक्त इतकंच नाही तर त्यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आता शिवसेनेचीच धुरा हाती घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.