तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम सुरू, पहा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. हजारो वर्षांच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या टोळभैरव मंदिरातील टाइल्स फरशा काढण्याला सुरुवात
तुळजभवाणी तिर्थक्षेत्राचा संपुर्ण कायापालट करण्यासाठी दोन हजार कोटींची आराखडा राज्यसरकारकडून अंतिम करण्यात आला आहे.
दरम्यान मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत.
मंदिर परिसरातील गोमुखतीर्थ आणि परिसराचाही जीर्णोद्धार केला जात आहे.
त्या ठिकाणी मोठे लोखंडी स्ट्रक्चर उभारून पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून कामाचे नियोजन करण्यात आल्याच मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.