Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: तृतीयपंथी सपना बाळूसोबत अडकली विवाह बंधनात
बीडमधील तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वाजवणारा बाळू आज विवाह बंधनात अडकले आहेत.बीडमधील कंकालेश्वर मंदिरात सपना आणि बाळूचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर जिवापड प्रेम करणारे बाळू आणि तृतीयपंथी सपना आजपासून आयुष्यभरासाठी सोबती बनले आहेत.
पारंपारिक धार्मिक विधीनुसार सपना आणि बाळूचा विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण मंगलाष्टिका झाल्यानंतर बीडमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थेमधील लोकांनी सपनाचं कन्यादान केलं.
काल सपनाच्या घरी धार्मिक परंपरेनुसार हळदीचा सोहळा उत्साहात पार पडला. या हाळदीच्या सोहळ्यासाठी सपनाच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला होता. याच मंडपात चौक भरला आणि या चौकावर सपना आणि बाळूला हळद लावण्यात आली होती.
सपना आणि बाळूच्या प्रेम कहाणीचे राज्यभरातून कौतुक होत आहे. दोन वर्षांच्या प्रेमकहाणीनंतर सपना आणि बाळूने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सपनाने तिच्या आयुष्यामध्ये कधीही तिला हळद लागेल असं स्वप्न बघितलं नव्हतं. परंतु, बाळूच्या साथीने काल सपनाला हळद लागली आणि आज ती बहोल्यावर चढली.
आज सकाळी साडेअकरा वाजता बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर परिसरात सपना- बाळू विवाह बंधनात अडकले आहेत.
बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली
मनमाडच्या तृतीयपंथी शिवलक्ष्मी संजय झाल्टे यांच्यासह त्यांचे पती संजय झाल्टे, शिवलक्ष्मी यांच्या सासू आणि किन्नर आखाडाचे महाराष्ट्र व्यवस्थापन प्रमुख श्रीमंत ऋषिकेश महाराज या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते.
सपना आणि बाळूचे नातेवाईकही या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.