Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच 'ग्रीन सी टर्टल'चं घरटं, कासवाची 74 पिल्लं तारकर्ली समुद्रात
Sindhudurg Green Sea Turtle : महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील देवबाग-तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या 'ग्रीन सी टर्टल' (Green Sea Turtle) या समुद्री कासवाच्या घरट्यातून 74 पिल्लं बाहेर येत समुद्रात उतरली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मच्छीमार आणि सागर प्रेमींनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवबाग-तारकर्ली किनारपट्टीवर समुद्री कासवानं अंडी घालून घरटं बनविल्याची घटना कासव मित्र पंकज मालंडकर 11 जानेवारी रोजी समोर आणली होती.
सुरुवातीला हे घरटं ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजातीचं असल्याचं बोललं जात होतं. परंतु या कासवाचे फोटो आणि व्हिडीओ येथील पर्यावरण विषयक अभ्यासक संदीप बोडवे यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविलं होते.
या फोटो आणि व्हिडीओमधील कासव हे 'ऑलिव्ह रिडले' या सागरी कासव प्रजाती पेक्षा काहीसं वेगळं वाटत असल्याचं कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कासव अभ्यासकांशी याबाबत चर्चा केली. सखोल माहितीसाठी फोटो आणि व्हिडीओ बंगळुरु येथील वाईल्ड लाईफ कॉन्झव्हेशन सोसायटीचं कासव अभ्यासक नुपूर काळे यांनाही पाठविण्यात आलं. काळे यांनी या फोटो आणि व्हिडीओंचा अभ्यास केल्यानंतर हे कासव ग्रीन सी टर्टल असल्याचं स्पष्ट केलं.
ग्रीन सी टर्टलनं अंडी घालून घरटं बनविल्यानंतर 52 दिवसांनी 'ग्रीन सी टर्टल'च्या घरट्यांमधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली.
सकाळी कासवाची पिल्लं घरट्यामधून बाहेर येतील याचा घरट्याचं रक्षक पंकज मालंडकर यांना पहिल्यापासून अंदाज असल्यामुळं ते पहाटेपासूनच घरट्याजवळ पहारा देत होते. घरट्यामधून 74 पिल्लं बाहेर आली.
महाराष्ट्रात पहिल्या 'ग्रीन सी टर्टल' घरट्याची नोंद देवबाग तारकर्लीच्या किनाऱ्यावर होणं आणि अंड्यातून पिल्लं बाहेर येणं ही येथील कासव संवर्धन करणाऱ्या निसर्ग मित्रांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मागील 52 दिवस हे घरटे आणि त्यातील अंड्यांचं संरक्षण करणं अतिशय महत्त्वपूर्ण होते. ग्रीन सी टर्टल या समुद्री कासव प्रजातीची भारतात फक्त गुजरात आणि लक्षद्वीप येतं घरटी आढळून येतात.