In Pics : आंबोलीतील अद्भूत सौंदर्य; नभात सप्तरंगी छटा, घाटातील दरीत ढगांची चादर
आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून जैवविविधतेने नटलेल्या आंबोलीतील अदभूत सौंदर्य खुलून आलं आहे. महाराष्ट्राचं अमेझॉन म्हणून आंबोली आणि तीलारीच्या खोऱ्याची ओळख असून याच आंबोलीत निसर्ग सौंदर्याने नटलेलं आणि जैवविविधता संपन्न असलेला हा भाग. (सर्व फोटो- काका भिसे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंबोली घाटात पर्यावरणाचं आगळंवेगळं रूप आज पाहायला मिळत आहे. नभात सप्तरंगी छटा, भरून आलेलं आकाश आणि आंबोली घाटातील दरी व्यापून टाकलेले ढग हे चित्र सध्या आंबोलीत अनुभवायला मिळत आहे.
आंबोली घाटात दाट धुकं आणि ऊन पावसाचा खेळ सध्या आंबोलीत सुरू आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व दृश्य पर्यावरण प्रेमी काका भिसे यांनी टिपली आहेत.
ऊन पाऊस असा लपंडाव इंद्रधनुष्याचे विलोभनीय आणि नेत्रसुखद असे नजारे सुद्धा आंबोलीत बघायला मिळतात.
ब्रिटीशकाळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिध्द आहे. निसर्गचे हे अद्भुत रूप घाटातून ये-जा करणाऱ्याना अनुभवता येतं.
हिरवाईने नटलेले डोंगर, दुधासारखे फेसाळत कोसळणारे धबधबे हे पावसाळ्यात आपलं मन मोहून टाकतात.
आंबोली घाटातील दरी ही ढगांनी व्यापून गेली असल्याने परशुरामाच्या कोकण भूमीत स्वर्ग सुखाची अनुभूती अनुभवत येते. त्यामुळे आंबोलीच्या सौंदर्य अधिकच खुलून गेलं आहे.