In Pics : पाच टप्प्यांत महाराष्ट्र अनलॉक होणार, कसं ते पाहा एका क्लिकवर

Feature_Photo_2

1/13
राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना राज्य शासनाकडून महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी करण्यात आली आहे.
2/13
आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.
3/13
ही अधिसूचना सोमवार म्हणजे 7 जूनपासून लागू होईल.
4/13
राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊ शिथिल करण्यात येत असला, तरीही यामध्ये स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
5/13
राज्य अनलॉक करण्यासाठी 5 टप्पे तयार करण्यात आले आहेत.
6/13
अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील.
7/13
पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.
8/13
राज्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा म्हणजे किमान सध्याच्या घडीला कोणत्याही शहरात 20 टक्क्यांहून पॉझिटीव्हिटी रेट अधिक नाही.
9/13
त्यामुळं कोणतंही शहर हे पाचव्या टप्प्यामध्ये आलेलं नाही.
10/13
पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील.
11/13
दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
12/13
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा राहिल.
13/13
राज्य शासनाच्या या निर्णयामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
Sponsored Links by Taboola