Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं परिवारासह दिलखुलास हास्य अन् सेलिब्रेशन; साजरा केला वाढदिवस
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज वाढदिवस.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांनी आपला वाढदिवस आपल्या परिवारासोबत साजरा केला.
दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा आहे.
सुप्रिया सुळे यांनी त्यांचे पती सदानंद सुळे आणि दोन मुलांसोबत वाढदिवस साजरा केला आहे.
त्यांनी वाढदिवसाचा केक कापत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याची चर्चा आहे.
फोटो शेअर करत त्यांनी म्हटलंय की, Blessed! My Kids - My Joy, My Happiness, My Strength and My Weakness
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं की, मला उध्दव ठाकरेंचा अभिमान वाटतो.
आज बाळासाहेबांची आठवण येतं आहे. सेना कुटुंबासारखी राहिली आणि राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
सुळे म्हणाल्या होत्या की, महाराष्ट्रात दडपशाहीचं सरकार नव्हतं आणि नसेल. कुटुंबात भांड्याला भांड लागतंच. यावर बसून चर्चा केली पाहिजे चर्चेतून मार्ग निघतो
. चर्चा झालीचं पाहिजे. सत्ता येते-जाते मात्र नाती ही कायमस्वरुपी राहतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.