Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : निसर्गाच्या सानिध्यातील आषाढी एकादशीनिमित्त सुमित पाटलांनी साकारली विठ्ठल-रुक्मिणीची विविध रूपं
महाराष्ट्राततील 800 वर्षांपासून चालत आलेल्या वारीत कोरोनामुळे खंड पडला. त्यामुळे वारकऱ्यांना लाडक्या विठुरायाचे दर्शन पंढरपूर नगरीत जाऊन घेता येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण निसर्ग आपल्या अवतीभवती असणाऱ्या गोष्टीतूनच आपल्याला विठ्ठल वारी घडवत असतो. ते जाणून घ्यायची फक्त दृष्टी हवी आणि ती दृष्टी कलाकाराला असतेच!
त्याचीच प्रचिती कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या निसर्गवारी मधून येत आहे.
देव चरा चरात व्यापला आहे. सुमित पाटील यांना कधी पानात विठ्ठल दिसला, तर कधी बाजरीच्या कणसात, तर कधी मक्यात, तर कधी वेणीच्या फुलात, शेंगात, कडुलिंबात, कधी प्रसादाच्या केळात तर कधी खोबऱ्यात... !
असा साध्या साध्या गोष्टीतून दिसलेला विठ्ठल त्यांनी साकारला आहे.
निसर्गनिर्मित वस्तूंमध्ये तयार झालेल्या या कलाकृतीना पोस्टर आणि व्हिडीओ स्वरूप त्यांनी दिले आहे.
गतवर्षी लॉकडाऊनमध्ये कोकणात असलेल्या सुमित पाटील यांनी मुंबई, बारामती, भोर अशा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातून ही सुरू केलेली वारी थेट कोकणात आली.
तिथे सुमित यांनी सुकलेल्या गवतातून तर 35 फुटी विठ्ठल साकारून दाखवून दिलं की निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे. आणि निसर्ग जपला की विठ्ठल भक्ती झालीच!
सुमित पाटील यांनी निसर्गाच्या सानिध्यात मिळलेल्या गवत, केळी, पान अश्या विविध वस्तूपासून विठ्ठल रुक्मिणी साकारली आहेत.