Bhandara : 3D रांगोळीच्या माध्यमातून दिवाळीनिमित्तानं साकारलं माता लक्ष्मीचं सुंदर रूप!
दिवाळीत आकाश कंदील, फराळ, पणत्यांची आरास आणि रोषणाईसोबत रांगोळीही तितकीच महत्त्वाची असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदारात किंवा अंगणात काढलेली सुंदर आणि सुरेख रांगोळी लोकांचं लक्षं आकर्षित करते.
भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुरच्या प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य हटवार यांनी दिवाळी निमित्त लक्ष्मीची 3 D रांगोळी काढली असून 6 फुट ऊंच 4 फुट रुंदी ची माता लक्ष्मीची 3D रांगोळी काढायला 2 दिवस लागले आहे
त्यांच्या 3D रांगोळी जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरु आहे
विशेष म्हणजे अनेक पुरस्कार प्राप्त ह्या रांगोळी कलाकार चित्रा वैद्य यांनी आधी ही अनेक देवी देवता व खेळाडु च्या 3D रांगोळी काढल्या आहेत.
तर गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार अरुण नाशिणे ,रोहित जंगले ,नितीन व्यास या रांगोळी कलाकारांनी देखील सिने अभिनेता ,क्रीडा खेडाळु ,तसेच देवी देवतांच्या रांगोळ्या साकारल्या आहेत
देशभरात कोरोनाच्या प्रार्दुर्भावात दिवाळी साजरी केली जात आहे. अशातच दिवाळी साधेपणाने साजरी केली जात असली तरी उत्साह मात्र तोच आहे.