Maharashtra Bhushan Award : समाजसुधारकाचा 'महा'सन्मान; ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीमत् दासबोधाच्या निरुपणातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं मोलाचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारींनी केलं.
नवी मुंबईत पार पडलेल्या अभूतपूर्व सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळी उपस्थित होती.
भव्य महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा नवी मुंबईच्या खारघरमधील सेन्ट्रल पार्क मैदानावर पार पडला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी हजारो श्रीसेवक उपस्थित होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 20 लाखांहून अधिक श्रीसेवक उपस्थित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री किताबाने सन्मानित डॉक्टर श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता.
आज त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2008 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. त्यावेळी ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेबांनी केलं आहे.
दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेतच, शिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे.
अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे.