Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो लोक खारघरमध्ये दाखल
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी भाविकांची खारमध्ये मोठी गर्दी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो लोक खारघरमध्ये दाखल झाले आहेत. खारघर या सोहळ्यासाठी सज्ज झालं आहे.
या सोहळ्यासाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या सोहळ्यासाठी खारघरमध्ये दाखल झाले आहेत.
खारघर स्टेशनवर मोठी गर्दी पाहायला मिळात आहे. मोठ्या रांगा लागल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Minister Amit Shah) यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
मोठ्या संख्येनं लोक खारघरच्या दिशेनं येत आहेत. खारघरमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी 20 लाख भाविक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज प्रदान केला जाणार आहे.
या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.