महाराष्ट्रातील 'चेरापुंजी'त घाट धोकादायक? आंबोलीत मुख्य धबधब्याजवळ कोसळला भलामोठा दगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात घाट रस्त्यावर दरवर्षी दरड कोसळत असतात. जिल्ह्यातील वर्षा पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या आंबोलीत आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मुख्य धबधब्याजवळ एक भलामोठा दगड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्टॉलच्या अगदी समोर येऊन रस्त्यावर राहिला हा दगड प्रचंड मोठा असून याठिकाणी सुदैवाने पर्यटन बंद असल्याने मोठी जीवित हानी टळली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाणकारांच्या मते वनविभागाने धबधब्यांच्या वरती बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे अशा प्रकारचे दगड किंवा छोट्या-मोठ्या दरडीखाली येण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे धबधब्यांवरील बंधारे लवकरात लवकर फोडून काढावेत अशी मागणी आंबोलीतील ग्रामस्थ करत आहेत.
याबाबत अनुभवी बांधकाम मजूर शिवा गावडे यांनी सांगितले होते की हे बंधारे बांधल्याने धबधब्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
आंबोलीत काही वर्षांपूर्वी असाच एक भलामोठा दगड एका कार वर येऊन कोसळला होता. त्या वेळी सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती.
आताही तेवढाच प्रचंड मोठा दगड या ठिकाणी येऊन स्टॉलच्या अगदी तोंडाजवळ येऊन थांबला. जर धबधब्यावरील पर्यटन सुरू असते तर मोठा अपघात घडला असता.
मोठी जीवित झाली असती. धबधब्याजवळील दरडीची पाहणी करून याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची गरज असून तसे न केल्यास भविष्यात अशा दरडी कोसळ राहतील. अशी ग्रामस्थांना भीती आहे तसं झाल्यास मोठी जीवित हानी होण्याची भीती व्यक्त केली आहे.