Raigad PHOTO : पावसाळ्यात किल्ले रायगडावर पायी जाताय? मग हे नक्की वाचा

(photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)

1/7
पावसाळ्यात किल्ले रायगड पायी चढणे टाळण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केलं आहे. (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)
2/7
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आलेले किल्ले रायगड हे नुकताच पुन्हा सुरू करण्यात आले आहे. (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)
3/7
परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी येथील पथ मार्गावर दरड कोसळल्याने शिवभक्त आणि पर्यटकांनी पावसाळ्याच्या कालावधीमध्ये गड पायी चढणे टाळण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
4/7
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानाचे श्रद्धास्थान असून राजधानी किल्ले रायगडावर वर्षभर शिवभक्त हजेरी लावीत असतात. (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)
5/7
पावसाळ्यात ही अनेक शिवभक्त हे किल्ले रायगडावर येत असून या परिसरातील सह्याद्रीच्या पर्वत रांगावरील नजारा हा विलोभनीय असतो.
6/7
गेल्या महिनाभरात झालेल्या पावसामुळे किल्ले रायगडावरील पायी चढण्याच्या मार्गावरील महादरवाजा दरम्यानच्या टप्य्यात काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच, या हंगामात किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर पाण्याचा तीव्र प्रवाह ही वाहत असल्याने अशा परिस्थितीत गड पायी चढणे अत्यंत धोकादायक होऊ शकते. (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)
7/7
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे असे आवाहन रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. (photo courtesy : FB/@YuvrajSambhajiraje)
Sponsored Links by Taboola