PHOTO : मालवण बोट दुर्घटनेप्रकरणी दोन बोट मालकांसह पाच जणांवर गुन्हा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील जगाच्या नकाशावर नावारुपाला आलेल्या तारकर्ली समुद्रात बोट दुर्घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मृत्युनंतर रात्री दोघा बोटमालकांसह पाच जणांवर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतच्या तक्रारीत लाइफ जॅकेट न देता असुरक्षितपणे समुद्रात पर्यटन करण्यासाठी नेल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तारकर्ली समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंग करण्यासाठी गेलेली बोट परतीच्या मार्गावर असताना समुद्र किनाऱ्यापासून 100 मीटर अंतरावर बुडाली.
यावेळी या बोटीत 20 पर्यटक होते. त्यात तीन लहान मुलं सुद्धा होती.
समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात मोठ्या लाटा येत होत्या. अशा परिस्थितीत समुद्रातून मोठी लाट आली आणि ही बोट कलंडून दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर एक अजूनही अत्यवस्थ स्थितीत आहे. त्याच्या मालवणमधील रेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघातील नितीन देशमुख यांचा भाचा आकाश देशमुख याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
ही दुर्घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. तसेच पंचनामा करण्याचे आदेश स्थानिक स्थानिक पोलिसांना दिले.