Photo : दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदावोस परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी भारतामधून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं एक प्रातिनिधीक मंडळ गेलं आहे.
यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, उर्जा मंत्री नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक आशिष कुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राला ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी जगभरातून गुंतवणूक आकर्षित करणे यासाठी प्रयत्न केला जात आहे.
प्लास्टिक पुनर्वापर क्षेत्रातील जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या बेल्जियमच्या जेमिनी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष सुरेंद्र पटावरी जी यांची महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं या कंपनीसोबत करार करण्यात आला.
प्लॅस्टिकच्या पुनर्वापरासंबंधी यूएईसोबतही एक करार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याने ग्लोबल प्लॅस्टिक अॅक्शन पार्टनरशीप यांच्यासोबत करार केला आहे.
या करारांमुळे राज्याच्या भविष्यातील शाश्वत विकासाचा रोडमॅप तयार होण्यास मदत होईल.