तळकोकणात आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा, 130 बालकांचा सहभाग
Sindhudurg Mango Eating Competition : आंबा हा कोकणचा अविभाज्य घटक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंबा खाणं प्रत्येकाला आवडतं. आता आंबे खाण्यासाठी चक्क स्पर्धा भरवण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील नाटळ सांगवेच्या वतीने कनेडी बाजारपेठत हापूस आंबा खाण्याची स्पर्धा भरवण्यात आली.
या आंबा खाण्याच्या स्पर्धेत 130 मुलांनी सहभाग घेतला.
यामध्ये लहान गटातून प्रथमेश संतोष सुतार तर मोठ्या गटातून सिध्देश महेश गावकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
दोन्ही गटातील प्रथम तीन विजेत्यांना वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्पर्धकांना तीन मिनिंटात जास्तीत जास्त आंबे खाण्याची अट होती.
या आगळ्या वेगळ्या स्पर्धात तब्बल 50 ते 55 डझन देवगड हापूस आंबे या स्पर्धेसाठी वापरण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
जिल्ह्यातील पाहिल्यांदाचं झालेल्या आंबे खाण्याच्या स्पर्धेत मुलांनी आंब्यावर यथेच्छ ताव मारत तब्बल सात ते आठ आंबे खाऊन एक आगळा वेगळा विक्रम केलाय.