PHOTO : वाशिममध्ये विहिरीत आढळले शिवलिंग, 350 वर्ष जुने असल्याचा दावा
सध्या देशात ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग असल्यावरुन जोरदार वाद आणि चर्चा सुरु असताना वाशिमच्या कारंजा इथे विहिरीची साफसफाई दरम्यान साडे तीनशे ते चारशे वर्ष जुने शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिम जिल्ह्यातील कारंजा शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दत्ताचे जन्म स्थान असो की स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी कारंजा लुटल्याची घटना असो, शहराला पुरातन लाभलेल्या वेसा असो की येथील पुरातन मंदिर, कस्तुरी वाडा, राणीचा बाथ, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या बंगल्याची प्रतिकृती असो यामुळे कारंजा नेहमी ऐतिहासिकदृष्ट्या चर्चेत असते. असे असले तरी आता इथे सापडलेल्या शिवलिंगामुळे कारंजा शहर पुन्हा चर्चेत आले आहे.
यावर्षी उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला असल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहे. वाशिमच्या कारंजा लाड शहरात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने शहरातील नागरिकांनी जुन्या विहिरीतून पाणी मिळावं यासाठी कारंजाच्या लोकमान्य टिळक चौकातील एका 30 फूट विहिरीतील गाळ काढायला सुरुवात केली.
गाळाने विहिरीचं शुद्ध पाणी मिळणं कठीण आणि पाणी कमी मिळत असल्याने गाळ काढण्यासाठी तरुण सरसावले. टिळक मित्र मंडळाने यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले. गाळ काढत असताना त्यात अडकलेले एक पुरातन शिवलिंग सापडले. विहिरीत शिवलिंग सापडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिवलिंग या विहिरीत नेमके कसे आले असा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरीत सापडलेले शिवलिंग हे नर्मदा नदीत सापडणाऱ्या शिवलिंगाप्रमाणे असून अशाप्रकारचे शिवलिंग नर्मदा नदी पात्रात आढळत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सापडलेल्या या लिंगाचे नर्मदेश्वर शिवलिंग असे नाव ठेवण्यात असून विहिरीजवळ असलेल्या एका झाडाखाली हे शिवलिंग ठेऊन विधिवत पूजन करुन भाविकांना दर्शनासाठी हे शिवलिंग खुले केले आहे.
विहिरीत शिवलिंग सापडल्याची चर्चा होताच गावातील नागरिकांची शिवलिंग पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हे शिवलिंग विहिरीत आले कुठून, इथे एखाद मंदिर होते का अशा चर्चा नागरिकांमध्ये होत आहेत.