PHOTO : ऐतिहासिक धामापूर तलावात लाखो मासे मृत, पाण्याचा रंगही झाला काळसर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जगप्रसिद्ध आणि शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या श्री देवी भगवती मंदिराशेजारील असलेल्या धामापूर तलावात अचानक आणि मोठ्या प्रमाणावर लहान मोठे मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअचानक मासे मृत होण्यामुळे संपूर्ण तलावाच्या काठावर मेलेले मासे तरंगत येऊन मृत माशांचा खच पडला आहे आणि संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पाण्याचा रंगही काही प्रमाणात काळसर झाल्याचे स्थनिकांच्या निदर्शनास आले आहे.
धामापूर भगवती मंदिर आणि तलावाच्या सुमारे 450 ते 500 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचे स्थानिक जाणकार व्यक्तींनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत होण्याचे नेमके कारण अजून निश्चित समजले नाही.
धामापूर तलावाचे पाणी धामापूर, काळसे, गावांसह संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरविले जाते. परंतु आता तलावात आणि काठावर लाखो मासे मरुन पाण्यावर तरंगत असल्याने पाणी दूषित झाले असल्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
काळसे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण काळसे गावात दवंडी पिटून धामापूर तलाव नळयोजनेचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांना नळाचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याचे आणि पाणी निर्जंतुक करुन वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.