कोकणातलं गाव तीन दिवसाच्या सुट्टीवर, ग्रामस्थ गेले गुराढोरांसह वेशीबाहेर
कोकणची एक अनोखी आणि आगळी वेगळी परंपरा म्हणजे 'गावपळण'. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावात ही परंपरा सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरवळनाथाच्या कौलाने दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात चिंदर गावची गावपळन ही परंपरा सुरू होते. चिंदर गावात गावपळणीला दुपार नंतर सुरवात होते. गावकरी गुराढोरांसह तीन दिवस वेशीबाहेर जायला निघाले. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होणार आहे.
आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी चिंदर गाव आजच्या विज्ञान युगातही गावाबाहेर जात. कुणी खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने गावाबाहेर जातात.
दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा कौल प्रसाद घेतला जातो. त्यानंतर गावपळणीला सुरवात होते.
चिंदर गावची गावपळण करण्यास रवळनाथाची परवानगी आसा काय, असं सांगणं करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून भटजींना विचारुन तारीख ठरवितात.
त्यानंतर गावच्या देवाला कौल लावला जातो. देवाने कौल दिला कि गावकरी गाव सोडून वेशीबाहेर राहुट्या उभारून राहतात. तीन दिवस तीन रात्री भजन फुगड्या खेळत मजेत आनंदाने घालवतात.
600 वर्षाची ही गावपळण परंपरा आजच्या विज्ञान युगातही निमित्त देवाच्या कौलाने चिंदर गाव सुट्टीवर गेलं. मोठ्या उत्साहाने पूर्ण गाव खाली करत रानावनात वेशीवर झोपड्यांमध्ये राहतात.
गावपळणीला काहीजण श्रद्धा तर काहीजण अंधश्रद्धा म्हणून पाहतात. मात्र चिंदर वासीय गावपळन म्हणजे गावाच्या ग्रामदेवताने दिलेला एक कौल म्हणून तो मानतात. या गावपळणीला चाकरमानी सुद्धा विशेष करून हजेरी लावतात.
तर काही मुंबई वासीय सुद्धा या गावपळीचा अनुभव घेण्यासाठी गावाच्या वेशीवर येऊन त्या गावपळनीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. या गावपळनीच्या निमित्ताने गावातील महिला एकत्रित येत तीन रात्री फुगड्या, संगीत खुर्चीचा खेळ तर पुरुष मंडळी भजन-कीर्तन असे वेगळे कार्यक्रम घेत मनोरंजन करत रात्र जागवत असतात.
गावाच्या वेशीबाहेर उभ्या राहिलेल्या या झोपड्या कोण्या भटक्या लोकांच्या नाहीत. तर हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चिंदर गाववासियांच्या. या गावात ५ ते ७ हजार लोकसंख्या आहे.
सर्व धर्मीय या परंपरेला मानून गावपळण प्रथेमुळे सुट्टीवर आहे. गेल्या 600 वर्षांपासून गावपळनीची परंपरा येथील लोकं पाळत आलेत. म्हणूनच आपले घरदार सोडून गावाच्या वेशीबाहेर आलेल्या या लोकांनी आभाळाच्या छायेखालीच तीन दिवस तीन रात्रीसाठी आपला संसार थाटलाय.
महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवण आणि त्यांचा आनंद घेण निरंतर शक्य होईल.
तळकोकणात कोठे कोठे आहे गावपळण परंपरा हेही पाऊयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात वायंगणी, आचरा व चिंदर, देवगड येथे मुणगे, वैभववाडीमध्ये शिराळे येथे आदी गावांमध्ये ‘गावपळण’ पाळली जाते. काही ठिकाणी दरवर्षी तर काही ठिकाणी तीन, पाच वर्षानि गावपळण केली जाते.
तळकोकणातील एक गाव ६०० वर्षांपासून पाळते आगळीवेगळी परंपरा, चिंदर गाव गेलं तीन दिवसांच्या सुट्टीवर, ग्रामस्थ गेले गुराढोरांसह वेशीबाहेर