Bharat Jodo: शेगावातील सभेला तुफान गर्दी, सभेआधी राहुल गांधींनी रांगेत उभे राहत घेतला महाप्रसाद
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज शेगावमध्ये संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांनी रांगेत उभे राहत महाप्रसादाचा लाभ घेतला.
राहुल गांधींच्या सभेला शेगावमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. आपल्या भाषणात राहुल गांधींनी सुरुवातीला संत गजानन महाराजांचा जयघोष केला.
या भाषणात त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर बोलणं मात्र टाळलं.
देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं
राहुल गांधी म्हणाले की, भीती, हिंसा, द्वेषानं तोडलं जातं तर प्रेमानं सर्व जोडलं जातं. भारत जोडोचं ध्येय हे 'मन की बात' करण्यासाठी नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला. हिंसा आणि द्वेषानं देशाला कधीच फायदा होणार नाही.
राहुल गांधींनी म्हटलं की, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे.
इथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. विम्याचे पैसे भरुन देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही उद्योगपतींचं मात्र हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातं, दोन-तीन उद्योगपती देशाचं कर्ज बुडवत आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
मुलं लाखो रुपए खर्च करुन शिक्षण घेतात. तरीही त्यांना रोजगार मिळत नाही, तरुणांना रोजगार नसलेला भारत आम्हाला नको आहे, असंही ते म्हणाले.
भारत जोडो यात्रेदरम्यान आज राहुल गांधींची आज शेगावमध्ये सभा झाली. सभेआधी राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतलं