Sindhudurg Savdav Waterfall : निसर्गरम्य कोकण! सावडाव धबधब्यावर पर्यटकांची रेलचेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2023 05:41 PM (IST)
1
गर्द हिरव्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून कोसळणारा हा धबधबा जवळपास 60 ते 70 फूट रुंद आणि 30 फूट उंचीवर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मुंबई गोवा महामार्गावरुन हा धबधबा सहा किलोमीटर अंतरावर आहे.
3
तर कणकवलीपासून अवघ्या 16 किमी अंतरावर हा धबधबा आहे.
4
सावडाव धबधबा हा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.
5
त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येऊ लागले आहेत.
6
या धबधब्याखाली पर्यटक आनंद लुटत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
7
तर पर्यटनासाठी जिल्ह्यासह राज्य आणि परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी आता सावडाव धबधब्यावर दिसू लागली आहे.
8
दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा म्हणून येथील ग्रामपंचायतीने पार्किंग कर देखील लावण्यास सुरुवात केली आहे.
9
हा धबधबा सुरक्षित असला तरी ग्रामपंचायतीकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.