Maharashtra Politics: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस... सर्वाधिक श्रीमंत कोण?
एवढंच काय तर, खऱ्या आयुष्यातही आपल्या मालमत्तेमुळे अनेक राजकाणी केंद्रीय यंत्रणांच्या कचाट्यात अडकल्याचं आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला या राजकाण्यांची खरी संपत्ती किती? हे माहीत आहे का?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाणून घेऊयात, सध्या महाराष्ट्राच्या राजकाणात चर्चेत असलेले नेते आणि त्यांच्या मालमत्तांसंदर्भात...
अजित पवारांच्या बंडानंतर महाराष्ट्रात भूकंप झाला. अजित पवारांनी बंड करत थेट थोरल्या पवारांना आव्हान दिलं. पण तुम्हाला माहीत आहे का? अजित पवारांची संपत्ती अजित पवारांपेक्षा जवळपास दुप्पट आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्याकडे एकूण 75.48 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.
निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एकूण संपत्ती केवळ 32.73 कोटी रुपये आहे. यामध्ये जंगम आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचा समावेश होतो.
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 कोटी 56 लाख 12 हजार रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, शिवसेना ठाकरे गटाते प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 143.26 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये जंगम आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचा समावेश होतो.
दुसरीकडे, जर आपण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याबाबत बोललो, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 3.78 कोटी रुपयांची संपत्ती आहे.