Shivrajyabhishek Din Photo: रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्याची क्षणचित्रे... पाहा फोटो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 349वा वर्धापनदिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त मावळ्यांच्या वेशभूषेत किल्ले रायगडावर दाखल झाले होते.
या सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर एकीकडे ढोलताशाचा गजर सुरू होता, तर दुसरीकडे गुलालाची उधळण करण्यात आली. या सोहळ्याला धनगर नृत्यानं तर आगळीच बहार आणली.
छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी विधिवत पूजा करून शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन साजरा केला.
या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ अँड सन्सकडून सोन्याच्या खास 350 होनांची निर्मिती करण्यात आली होती. याच सोन्यांच्या होनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला.
रायगडावर एका शिवभक्ताने सोनं आणि चांदीचं नक्षीकाम असलेली तलवार आणली होती. या तलवारीची निर्मिती शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी करण्यात आली होती. तसेच देशभरातील 21 नद्यांचं पाणीही अभिषेकासाठी आणण्यात आलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. या शिवभक्तांनी केलेल्या शिवरायांच्या जयघोषानं अवघा रायगड दुमदुमून गेला होता.
तिथी आणि तारीखेप्रमाणे अवघ्या चार दिवसांत शिवराज्याभिषेकाचे दोन सोहळे झाले आणि शिवप्रेमींकडून दोन्ही सोहळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.