Shivrajyabhishek : छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना! वारली कलेतून साकारला शिवराज्याभिषेक सोहळा
6 जून रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले.
आज 6 जून... आज तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक यांनी सुंदर कलाकृती साकारली आहे.
कौशिक दिलीप जाधव यांनी वारली चित्रकलेतून शिवराज्याभिषेक सोहळा रेखाटला आहे. ही कलाकृती बनवताना वॉटर कलर्सचा वापर केला आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याची वारली पेंटींग काढण्यासाठी त्यांनी एक तासाचा कालावधी लागला.
कौशिक जाधव यांनी पहिल्यांदा वारली चित्रकला काढून छत्रपती शिवाजी महाराज्यांना मानाचा मुजरा आपल्या कलाकृतीतून दिलेला आहे.
चित्रकार कौशिक जाधव यांनी ही कलाकृती साकारण छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे.
आज राज्यासह देशात शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातसह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले आहेत. यंदाचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडत आहे.