Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, ठिकठिकाणी जयंतीचा उत्साह
शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांच्या जयंतीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंती निमित्त शिवनेरी गड आणि जुन्नर परिसरात कलम 144 लागू करण्यात आलंय. गडावर केवळ मोजक्याच व्यक्तींना जाण्याची मुभा आहे, त्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने तसा निर्णय घेतलाय
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शिवाजी महाविद्यालय परिसरातील महाराजांच्या पुतळ्याला अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
त्याचसोबत फुलांची आरास देखील करण्यात आली आहे. आज मुंबई विमानतळावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावरील पुतळ्याला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे.
यंदा प्रथमच हा शिवजयंती उत्सव आशेरी गडावर युवा शक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे
आजही या गडावर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला आहे. युवा शक्ती प्रतिष्ठान कडून गडाची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यात आली.
पालघरच्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या आशेरी गडावर युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरकडून रात्री शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -