Shivaji Maharaj Jayanti 2021 : सोलापुरात शिवरायांना अनोखं अभिवादन, मुस्लिम तरुणाने साकारली भव्य रांगोळी

सोलापुरात शिवरायांना अनोखं अभिवादन, अर्ध्या एकरात शिवरायांची प्रतिमा, तर मुस्लिम तरुणाने साकारली भव्य रांगोळी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील बाळे परिसरात प्रतीक तांदळे या तरुणाने शिवाजी महाराजांची 150 फूट प्रतिमा आपल्या शेतात तयार केली आहे.

शेतातील ज्वारीच्या कडब्याचा वापरून करून अर्ध्या एकर शेतात महाराजांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. लोकआस्था युथ फाउंडेशन यांच्या संयोजनाने जवळपास दहा दिवसात ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.
जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी यासाठी लागल्याची माहिती अय्युब पठाण यांनी दिली.
15 फूट बाय 40 फुटांची ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
सोलापुरातील चिरागअली सोशल फाउंडेशनचे अय्युब पठाण यांच्यावतीने दयानंद महाविद्यालयात महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
सोलापुरातील मुस्लिम युवकाने देखील महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -