Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवजन्मोत्सवानिमित्त मंगळवेढ्यात महिलांनी काढली तलवार व मशाल रॅली

यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे , मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा व इतर महिला उपस्थित होत्या .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या रॅली नंतर बरोबर बारा वाजता सजवलेल्या बाळ शिवाजी राजांना पाळण्यात घालून हा जन्मोत्सव महिलांनी साजरा केला .

सध्या महिला आणि मुलींवर वाढत चाललेले अत्याचारासाठी महिलांनी हातात मशाल व तलवार घेऊन रॅली काढल्याचे आयोजक कोमल ढोबळे यांनी सांगितले.
सध्या पुन्हा कोरोनाचे संकट वाढत चालल्याने मोजक्या महिलांना पोलिसांनी परवानगी दिली होती.
शिवजन्मोत्सवाची धूम सध्या देशभर सुरु असताना मंगळवेढा येथे रात्री बारा वाजता पाळणा म्हणून शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सावली फौंडेशन आणि मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला.
जिजाऊच्या वेशात या महिलांनी एका हातात मशाल व दुसऱ्या हातात तलवार घेत दामाजी चौकात रॅली केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -