Shiv Sena Dasara Melava History : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा हा इतिहास माहित आहे का?
30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी पहिला दसरा मेळावा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमार्मिक'मधून पहिल्या दसरा मेळाव्याला येण्याचं आवाहन पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांचा शर्ट-पँट असा साधा वेश होता.
शिवाजी पार्कच्या मैदानावर तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी उसळली. उपस्थितांमध्ये स्टीलचा डबा फिरवून देणगी जमा करण्यात आली होती.
मेळाव्याला एकाही पोलिसाचं संरक्षण नव्हतं. महाराष्ट्रातील अनेक पैलवानांकडे सुरक्षेची धुरा सोपवण्यात आली होती. मेळाव्यासाठी चाळी, छोट्या खोल्या, व्यायामशाळांत बैठका झाल्या होत्या.
1975 साली दसरा मेळाव्यातूनच शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला.
1982 साली शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आले होते. 1985 साली शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका मेळाव्यात जाहीर करण्यात आली.
1991 च्या मेळाव्यात वानखेडेवरील भारत-पाक सामन्याला विरोध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला. 1996 साली राज ठाकरेंच्या कल्पनेतल्या शिवउद्योग सेनेची घोषणा करण्यात आली.
2010 साली आदित्य ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातच लॉन्चिंग करण्यात आले. युवा सेना या संघटनेची घोषणा करण्यात आली.
2011 साली बाळासाहेबांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अखेरचा मेळावा पार पडला.
2012 साली प्रकृतीमुळे बाळासाहेबांचं रेकॉर्डेड भाषण दाखवलं.
2013 साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातला पहिला मेळावा पार पडला.