Pankaja Munde Dasara Melava : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांची तोबा गर्दी!
भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी केली आहे. सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेसाठी अवघा जनसागर लोटला आहे.
याआधीच्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती.
त्यानंतर आता, मंगळवारी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात कोणत्या मुद्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यात दसऱ्यानिमित्ताने होणाऱ्या काही दसरा मेळाव्यांना महत्त्व आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा, शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा याचा समावेश होतो.
2019 विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता.
त्यानंतर पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपमध्ये सक्रिय नसल्याचे चित्र दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमधील एक गट कार्यरत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा रंगली होती.
मात्र, पंकजा यांना भाजपकडून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. मात्र, पंकजा या मध्य प्रदेशमध्ये फार सक्रीय नसल्याचेही म्हटले जात आहे.
भगवान भक्तिगड ट्रस्टच्या वतीने पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला. सभेआधी साडी-चोळी आणि पुष्पाहार देऊन पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला.
थोड्याच वेळात पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात बीडमध्ये जनमुदायाला संबोधित करणार आहेत.
पंकजा मुंडेंचं सावरगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
पंकजा मुंडे येण्याअगोदर सभास्थळी गोंधळ झाला. सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर होत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या हजेरी अगोदर सभास्थळी गोंधळ झाल्याचं चित्र दिसून आलं.
काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का असा सवाल कार्यकर्त्यांकडून होत असून गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर काढण्याचं आवाहन केलं जात आहे.