Pune news : सरनोबत सरसेनापती कंक घराण्याचे पारंपारिक शस्त्रपूजन, पाहा फोटो...
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज संस्थापित हिंदवी स्वराज्याची इमाने इतबारे सेवा करणारे, स्वराज्याचे निष्ठावंत पायदळ प्रमुख तथा सरनोबत येसाजीराव कंक आणि कंक घराण्यातील इतर सरदार वीर पुरुषांनी युद्धात वापरलेल्या सर्व शस्त्रांचे पूजन खंडेनवमी दिवशी परंपरेप्रमाणे कंक घराण्याच्या वंशजांच्या हस्ते पार पडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुजा करुन या शस्त्राची आणि कंक यांची आरतीदेखील करण्यात आली.
यावेळी भोर, वेल्हा, पुणे, मुंबई, सातारा भागातील अनेक शिवभक्तांनी कंक घराण्याच्या शस्त्रांचे दर्शन घेण्यासाठी सरसेनापती येसाजी कंक वाडा, भुतोंडे येथे भेट दिली.
यावेळी कंक घराण्यातील वंशजांपैकी शशिकांत कंक, संजय कंक, राजेंद्र कंक, शिवाजी कंक आणि सिद्धार्थ कंक उपस्थित होते.
गेल्या अनेक पिढ्यांपासून वंश परंपरेनुसार दरवर्षी खंडेनवमी दिवशी कंक घराण्यातील या सर्व पराक्रमी शस्त्रांची पूजा कंक घराण्याचे वंशज भुतोंडे येथील येसाजी कंक यांच्या ऐतिहासिक वाड्यात करत असतात.
या पूजेद्वारे आपल्या पूर्वजांनी ज्या शस्त्रांच्या सहाय्याने हे स्वराज्य राखले. आपल्या शिवछत्रपतींना साथ दिली त्या शस्त्रांप्रती तसेच आपल्या पूर्वजांप्रती आदरभावना व्यक्त केली जाते.
या कार्यक्रमादिवशी या सर्व ऐतिहासिक शास्त्रांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून असंख्य शिवभक्त सरसेनापती येसाजी कंक वाड्यास भेट देतात.
कंक घराण्याचे वंशज सिद्धार्थ कंक सांगतात की हे प्राचीन शसत्र पाहण्यासाठी अनेक लोक येतात.