PHOTO : न्यायालयाच्या निकालानंतर राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष
दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यासाठी आज उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी पेढे वाटले. तर काही ठिकाणी गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? याचा फैसला आज न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी बुलढाण्यात पेढे वाटून आनंद साजरा केलाय.
पुण्यात शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसैनिकांकडून मातोश्रीवर देखील जल्लोष साजरा करण्यात आला. मातोश्रीवर मोठ्या प्रमाणावर महिला शिवसैनिक उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत सेलिब्रेशन केलं. आज रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय जोरदार घोषणाबाजीही केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कात दसरा मेळावा घ्यायची परवानगी मिळाली आणि बंडखोर आमदाराच्या मतदारसंघातही शिवसेना समर्थकांनी जल्लोष केला. मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आतिषबाजी केली.
न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाकडून निकाल दिल्यानंतर शिवसैनिकांनी जळगावत पेढे वाटप करत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर तळकोकणातील शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या होम ग्राउंडवर सावंतवाडीत शिवसैनिकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतोषबाजी केली.