PHOTO : यळकोट यळकोट जय मल्हार! अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्याची सुरुवात जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सकाळी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचं निर्मला सीतारमण यांनी दर्शन घेतलं.
यावेळी त्यांनी तळी भंडार करुन भंडाऱ्याची उधळण केली.
खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होत भारतासाठी साकडं घातलं.
यावेळी अंकिता पाटील आणि आमदार माधुरी मिसाळ देखील त्यांच्यासोबत होत्या.
तसेच यावेळी निर्मला सीतारामन यांना संस्थच्या वतीने निवेदन देण्यात आलं.
जेजुरी गडाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा, असं निवेदन देण्यात आलं.
आमदार राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, आणि कांचन कुल उपस्थित होत्या. यावेळी मार्तंड देवस्थानच्या वतीने निर्मला सीतारमण यांचा सत्कार करण्यात आला.