Shirdi Sai Baba : शिर्डी साईबाबांचा 4 दिवसीय पुण्यतिथी सोहळा आजपासून प्रारंभ, मंदिराला आकर्षक सजावट
साईबाबांच्या 103 व्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा उद्या विजयादशमीचा मुख्य दिवस असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आलाय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरी व्हा संदेश देणाऱ्या साईबाबांचे 1918 साली विजयादशमीच्या दिवशी महानिर्वाण झाले होते.. तेव्हापासून दरवर्षी साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो.. आजपासून साईबाबांच्या 103 व्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे...
चार दिवस चालणाऱ्या उत्सवाचा प्रारंभ आज सकाळी काकड आरतीने करण्यात आला.. यावेळी साई मंदिरातून ग्रंथ मिरवणूक काढून उत्सवाला सुरवात झाली.. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सर्व चरित्राच्या पहिल्या अध्यायाच वाचन केले..
अहमदनगर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर साईमंदिर प्रशासनाला कोरोना नियमांचे पालन करावे लागत आहे. . दररोज फक्त 15 हजार भाविकांना ऑनलाईन पासच्या माध्यमातून दर्शन दिले जात आहे.
पुण्यतिथी उत्सवाला लाखो भाविक शिर्डीत येत असतात मात्र यावेळी मोजक्या पुजारी आणी अधिका-यांच्या उपस्थितीत हा उत्सव चार दिवस साजरा केला जातोय.. साईमंदिर आणी परिसरातील मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तर मंदिर आकर्षक विद्यूत रोषणाईने नटले आहे..
उद्या विजयादशमीच्या दिवशी उत्सवाचा मुख्य दिवस असून पारंपरिक पद्धतीने होणारे भिक्षा झोळी सह विविध कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार असून भक्तांनी नियमांचे पालन करावे असं आवाहन साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी केले आहे..