Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : बिग बॉसच्या घरातून परतल्यावर युवा कीर्तनकार शिवलिलाताई पाटील विठ्ठलाच्या दरबारात !
युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील या मराठी बिग बॉसच्या घरात जाणार या बातमीनेच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.. त्या बिग बॉसच्या घरात तब्बल दोन आठवडे राहिल्या.. (photo: @patil.shivlila/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअत्यंत लहान वयात महिला कीर्तनकार म्हणून त्यांना राज्यभरात मोठी प्रसिद्धी मिळाली.. त्यांचे असंख्य चाहते आणि त्यांच्या कीर्तनासाठी गर्दी करणारा मोठा श्रोता वर्ग आहे. (photo: @patil.shivlila/IG)
बिगबॉसच्या घरात गेल्याबद्धल शिवलीला पाटील यांना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं.. (photo: @patil.shivlila/IG)
महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याबाबत हा शो पाहणाऱ्या मराठी आणि अमराठी वर्गाचे प्रबोधन करावे याच हेतूने मी बिग बॉसच्या घरामध्ये गेल्याचे कीर्तनकार शिवलिला पाटील सांगतात (photo: @patil.shivlila/IG)
बिग बॉसच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या सोबत झालेल्या वादावर बोलताना, त्यांनी मर्यादा पाळत त्यांना योग्य शब्दात, योग्य पद्धतीने चोख उत्तर दिल्याचा दावा केला (photo: @patil.shivlila/IG)
मराठी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय चुकला असला तरी हेतू प्रामाणिक असल्याचा दावा त्यांनी काल पंढरपुरात आल्यावर एबीपी माझाशी बोलताना केला (photo: @patil.shivlila/IG)
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात कधीही हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर नृत्य केली नाहीत असा दावाही त्यांनी केला. आपल्या बिगबॉसमध्ये जाण्यामुळेच तिथे पुंडलिक वरदा हरि विठ्ठलचा गजर झाला असा युक्तिवादही त्यांनी केला. (photo: @patil.shivlila/IG)
भविष्यात ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असे निर्णय घेणार नाही, असंही त्यांनी नमूद केलंय. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सुरवातीला घरातील मंडळींनीही विरोध केला होता, मात्र त्यांनी आपल्या हेतू समजून घेतल्यावर परवानगी दिली असंही शिवलिला पाटील यांनी सांगितलं (photo: @patil.shivlila/IG)
बिग बॉसमध्ये भाग घेतल्यानं चर्चेत आलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर बुलढाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, आयोजकांनी शिवलिला पाटील याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे गर्दी जमली आणि कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग झाला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. (photo: @patil.shivlila/IG)
शिवलिला पाटील यांच्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी होण्यामुळे वारकरी संप्रदायातील काही जणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली होती, मात्र शिवलिला पाटील यांनी काल त्याबद्धल दिलगिरी व्यक्त केली आहे. (photo: @patil.shivlila/IG)
बुलढाण्यात काही ज्येष्ठ कीर्तनकारांनी शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाला विरोध केल्याचीही बातमी होती.. त्यामध्ये विश्व वारकरी सेना आघाडीवर असल्याचं बातमीत म्हटलं आहे (photo: @patil.shivlila/IG)