Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीनिमित्त विठ्ठल मंदिराला शेवंती व बेलपत्राची आरस
विठुरायाने मस्तकी पिंडी धारण केली असल्याने विठ्ठल हा हरी - हर असा भेद नसलेला देव अशी शेकडो वर्षाची मान्यता आहे .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळेच आज महाशिवरात्री निमित्त विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यासह मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पंढरपूर येथील भाविक अनंत नंदकुमार कटप यांनी शेवंती व बेलपत्राच्या साहाय्याने अतिशय कल्पकतेने सजविण्याची सेवा दिली आहे .
महादेवाला पांढरे फुल आणि बेलपत्र प्रिय असते म्हणून शेवंती व बेलपत्राचा वापर या सजावटीत केला आहे.
बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमाही अत्यंत आकर्षकरीत्या फुल सजावटीत वापरण्यात आल्या आहेत.
एकादशी प्रमाणेच विठ्ठल मंदिरात महाशिवरात्रीलाही वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असते.
महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.
दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव देखील साजरा होतो
महाशिवरात्रीला मंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते.
मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे केवळ फुल सजावट करीत धार्मिक परंपरा साजऱ्या केल्या जाणार आहेत .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.