Mahashivratri 2021 PHOTO : बम भोले... भगवान शिवशंकराच्या आराधनेचं महत्व
भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते.
या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते.
महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.
महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी परंपरा आहे.
बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात.
तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे.
प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे.
पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात.
image 11
image 12