अमेरिकेतील शीतलने संतांच्या 20 अभंगांसोबत विठ्ठलाचे नवे रूप रेखांकित केले
मूळची मुंबईकर असलेली शीतल सध्या अमेरिकेतील बोस्टनस्थित सुलेखनकार असून स्व-अध्ययनातून गेली 10 वर्षे सुलेखन प्रयोग करीत आहे. (sheetaltara21)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षरकलावारी हा सुलेखन आणि रेखांकनाचा एक विशेष उपक्रम आहे. (sheetaltara21)
दरवर्षी पंढरीच्या वारी सोबत दर दिवशी एक या प्रमाणे शीतल ही 20 संतांचे 20 वेगळे अभंग आणि त्यासोबत विठ्ठलाचे नवे रूप रेखांकित करत असते. (sheetaltara21)
आळंदी आणि देहूवरुन निघालेल्या पालखी आषाढी एकादशीला पंढरीत पोचतात. त्या दिवशी या उपक्रमाची देखील सांगता होते. (sheetaltara21)
अक्षरकलावारी हा उपक्रम सुरु करताना अनेक विचार शीतलच्या मनात होते. देवनागरी लिपी ही हजारहून अधिक वर्षांपूर्वी निर्माण झाली. (sheetaltara21)
शीतल म्हणते अमेरिकेतील चेरी ब्लॉसम महोत्सव, स्पेनचा टोमॅटीनो उत्सव, फ्रान्स मधील टूर डे फ्रान्स हे जर जगातील लोकप्रिय आणि आकर्षक महोत्सव असतील तर तेच महत्व पंढरीच्या वारीलाही मिळायला हवे. विठ्ठलाचे रूप फार गोजिरे आहे, कपाळीचा टिळा, कानातील मत्स्यकुंडले, कटीवर असलेले हात हे रूप रेखांकनाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे. आणि अभंगाचे म्हणाल तर तिचा प्रयत्न अभंगातील विविधता समोर आणण्याचा आहे. (sheetaltara21)
शीतलच्या या उपक्रमातील कलाकृती दरववर्षी समाजमाध्यमांमध्ये फार लोकप्रिय होत असतात. यावर्षी तिने अनेक नवीन सुलेखनकारांना या उपक्रमामध्ये आमंत्रित केलेले आहे भारत, जर्मनी आणि अमेरिकेतील देवनागरी सुलेखनकारांच्या कलाकृती या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. (sheetaltara21)
ट्विटर आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून 9 लाख लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. (sheetaltara21)