Ashadhi Wari : ‘ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत
‘ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात आगमन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामतीत ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
दोन वर्षांच्या खंडाने पालखी बारामती तालुक्यात येत असल्याने पालखी मार्गावर स्वागतासाठी स्वागत कमानी, रांगोळी, पताका, फलक लावण्यात आले होते
वारकऱ्यांसोबतच पालखी मार्गावरील उत्साहाचं वातावरण पहायला मिळाले. प्रत्येक गावातील लहान-मोठे वारकरी अगदी उत्साहाने वारकऱ्यांची सेवा करत आहे.
पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी देखील होत आहे.
यंदा अजून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना बळीराजा विठ्ठलाकडे करत आहे.
बारामती नगरपालिकेसमोरील शारदा प्रांगण येथे पालखी मुक्कामी राहणार आहे.
पालखी सोहळा उद्या सकाळी बुधवारी इंदापूर तालुक्यातील सणसर मुक्कामी मार्गस्थ होणार आहे. (फोटो क्रेडिट - स्वप्नील शिंदे)