PHOTO : मांढरदेवी गडावर काळूबाईची यात्रा, भाविकांना बंदी, घरबसल्या घ्या देवीचं दर्शन

shakambhari purnima in 2022 Kalubai yatra
1/9
shakambhari purnima in 2022 : आज शाकंभरी पौर्णिमा. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा (Mandhardevi Gad Kalubai Yatra) शाकंभरी पोर्णिमेला भरते.
2/9
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यात यंदाच्या वर्षी काळूबाईचे दर्शन होईल असं भाविकांना वाटत होतं.
3/9
मात्र ओमायक्रॉनमुळे यंदाच्याही वर्षी मांढरदेवी गडावर यात्रेच्या दिवशी येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
4/9
भाविकांना बंदी घालण्यात आली असली तरी दरवर्षीप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांमार्फत आणि गावातील ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज यात्रा पूर्ण केली जात आहे.
5/9
भाविकांनी गडावर येऊ नये यासाठी पंचक्रोशीतील सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून गडावर भाविकांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
6/9
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात.
7/9
समुद्रसपाटीपासून 5000 फूट उंचीवर असलेल्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्टया शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई - भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे.
8/9
द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासूराचा सेनापती देवीलाख्यासूराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली.
9/9
या युद्धात काळभैरवनाथाने देवीला साहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांढव्यऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले, अशी अख्यायिका आहे.
Published at : 17 Jan 2022 07:39 AM (IST)