Nanded : छत्रपती संभाजी राजेंनी घेतला जंगल सफारीचा आनंद
नांदेड येथील किनवट अभयारण्यात छत्रपती संभाजी राजेंनी घेतला जंगल सफारीचा आनंद.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड येथे खासगी कामानिमित्त आलेल्या छत्रपती संभाजी राजेंनी यावेळी श्री क्षेत्र माता रेणुकादेवी मंदिर माहूरगड येथे भेट दिली.
मंदिर समितीकडून त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी जंगलातून कमी होत असलेल्या वाघ, बिबट्या, अस्वल, नीलगाय, हरीण ह्या जंगली प्राण्यांचे संवर्धन व्हावे, या दृष्टीने किनवट अभयारण्यात फेरफटका मारला.
तसेच किनवट माहूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल सफारी व पर्यटन विकासास याठिकाणी मोठा वाव असल्याचेही प्रामुख्याने नमूद केले.
येत्या काळात या जंगलातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी व येथील पर्यटनाला वाव देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने विशेष प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजी राजेंनी घेतलेल्या जंगल सफारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.