Sawan 2021: श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं, आकर्षक फुलांची सजावट, पाहा फोटो
आज पवित्र श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रावणी सोमवार हरिहराचे प्रतीक मानल्या गेलेल्या विठुरायाच्या मुंबई येथील भक्ताने आकर्षक फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे.
विठुरायाच्या मस्तकी पिंडी असल्याने वारकरी संप्रदाय याला हरिहरा नाही भेद मानतो.
श्रावण महिना महादेवाचा मानला जातो . त्यामुळे विठ्ठल मंदिरात या महिन्यात अनेक धार्मिक परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्या आहेत .
श्रावणी सोमवारचे औचित्य साधून मुंबई येथील भक्त डॉ मंजुळ हुंनूर यांनी ही आकर्षक फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे .
ही सजावट करतानाही हरिहरा नाही भेद हीच थीम ठेवली आहे .
यामुळेच फुलामधून महादेवाचे गंध , विष्णूचा शंख साकारले आहे .
यासाठी आरकेड , लॅंडो , कारनीशयन , शेवंती , कामिनी , सांगोप , ड्रीसीना , जिप्सी आशा देशी विदेशी फुलांचा वापर केला आहे