Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Savitribai Phule : नायगावमधील सावित्रीबाईंचं घर, जिथं त्यांचं बालपण गेलं... पाहा घर आणि स्मारकाचे खास फोटो
Savitribai Phule Birth Anniversary: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला.
भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं.
त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली
सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.
सावित्रीबाई फुलेंच्या 191 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगावमधे असलेल्या सावित्रीबाईंच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आज लोकांची गर्दी पहायला मिळतेय.
नायगावमधील नेवसे वाड्यामधे हे स्मारक आहे
3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाई फुलेंचा जन्म त्यांचे वडील खंडोजी नेवसे यांच्या नायगाव मधील या वाड्यात झाला होता.
आता या वाड्याचे राज्य शासनातर्फे स्मारकामधे रुपांतर करण्यात आलय.
ही सावित्रीबाई फुले यांच्या घरातील स्वयंपाक खोली आहे.
हा त्यांच्या घरातील सोपा...
याच खोलीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता.
सावित्रीबाई फुले यांच्या घरात धान्य साठविण्यासाठी जमिनीखाली अनेक फुट खोल असलेले भांडारघर...
जमिनीखाली अनेक फुट खोल धान्य साठवण्याची पेव...