In Pics : अवघा रंग एक झाला... पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाल असताना पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात फळांची आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने अनोख्या पद्धतीने केले आहे.
आळंदी येथील प्रदीप ठाकूर पाटील यांनी विठ्ठल रुक्मीणी गाभारा, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फळांचा आणि फुलांचा वापर करून अतिशय मनमोहक अशी सजावट केली आहे.
या सजावटीसाठी संत्री , मोसंबी , अननस , केळी , सफरचंद, डाळिंबे या फळांचा वापर करण्यात आला आहे.
गुलाब जरबेरा , कामिनी , ब्ल्यू डीजे , एंथोरियम , शेवंती , ऑर्केट, मिनीपाम , संगोप , ड्रेसिना सायकस यांचा अतिशय कल्पकतेने वापर केला आहे.
या सजावटीसाठी 1500 किलो देशी विदेशी फुले आणि 700 किलो फळांचा वापर करण्यात आला आहे .
नवीन वर्षात विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे स्वागत अशा अनोख्या सजावटीमध्ये करण्यात आले आहे .
आरस केल्यामुळे त्यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभान्यासह मंदिरास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर मंदिर सज्ज झाले आहे.